धक्कादायक ! बालमजुरीसाठी लहानग्यांची तस्करी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
मुंबई : कारखाने आणि छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी लहान मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. बिहार आणि नेपाळहून मुलांना मुंबईत घेऊन आलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तस्करी करण्यात आलेली ही मुले १३ ते १६ या वयोगटीतल आहेत. अशा तब्बल २१ मुलांची या टोळीच्या हातातून सुटका करण्यात आली.
 

मोहम्मद सादिक मन्सुरी, सुकेश्वर राऊत आणि एकलाक हसन, जाफर शेख, अब्दुल शेख या पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या टोळीमध्ये आणखी काही आरोपी देखील सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे. ‘प्रथम’ आणि ‘पालवी चाइल्डलाइन’ या बालमजुरीविरोधात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना या तस्करीबद्दल माहिती मिळाली. या संस्थांनी ही माहिती वेळीच मुंबई पोलिसांच्या बालसहायक पोलिस युनिटला दिली.

 
शनिवारी सकाळी ही टोळी या मुलांना घेऊन कर्मभूमी एक्सप्रेसने लोकमान्य टिळक टर्मिनसला येणार होती. बालसहायक युनिटचे सहाय्यक पोलिस आयुक्त माने यांनी सापळा रचला. परंतु कुर्ला टर्मिनस ऐवजी कर्मभूमी एक्सप्रेस ही ठाणे स्थानकात थांबणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने लगेच धाव घेतली. शनिवारी दुपारी मुलुंड परिसारातून पोलिसांना या २१ मुलांची सुटका केली.
 
 
या २१ अल्पवयीन मुलांपैकी ८ जण हे नेपाळमधील असून १३ जण हे बिहारचे आहेत. या सर्व मुलांना डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही मुले गरीब कुटंबातील असून त्यांच्या पालकांना पैशाचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर या मुलांना मुंबईत बालमजुरीसाठी आणले गेले. तुटपुंजी रक्कम पालकांना देऊन त्यांच्या लहानग्यांना १८-२० तास इथे मुंबईत राबवून घेण्याचा या टोळीचा डाव होता. परंतु मुंबई पोलिसांनी हा डाव उधळून लावला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@