शेअर बाजारात तेजी परतली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |
 

 

मुंबई : महिन्याभरापासून गडगडत चाललेल्या शेअर बाजारात सोमवारी तेजी परतली. गुंतवणूकदारांनी आयटी आणि फार्मा शेअरमध्ये केलेल्या खरेदीमुळे निफ्टी आणि सेन्सेक्स वधारले. दिवसअखेर सेन्सेक्स १३२ अंशांनी वधारुन ३४ हजार ८६५च्या स्तरावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंशांनी वधारत १० हजार ५१२ वर बंद झाला.
 
 
गेल्या आठवड्यात शुक्रवार दि. १२ ऑक्टोबरनंतर बाजारातील सलग दुसऱ्यांदा तेजी दिसून आली. एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्सची चांगली कामगिरी, आयटी फार्मा शेअरमध्ये झालेली यामुळे दोन्ही निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी वधारलेआयटीसी, इन्फोसिस, आयटीसी, ओएनजीसी, टीसीएस, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, विप्रो, रिलायन्स, टाटा मोटार्स, भारती एअरटेल, एचडीएफसी आदी शेअर वधारले
 
 
एचयुएल, महिंद्रा एण्ड महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, येस बॅंक, कोटक बॅंक, बजाज ऑटो, पावरग्रीड आदी शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. मिडकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला तर स्मॉलकॅप शेअरमध्ये खरेदी झाली. मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप ०.६२ टक्क्यांनी वधारला तर निफ्टी मिडकॅप ०.९३ टक्के वधारला. बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स १.३७  टक्क्यांनी वधारुन बंद झाला.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@