कारावासात गीता उपनिषदांमुळे बदलले आयुष्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
 
सुहैब इलियासी यांचे वक्तव्य
 
 

नवी दिल्ली : माजी टीव्ही अँकर सुहैब इलियासी यांची नुकतीच त्यांच्या पत्नीच्या खूनाच्या आरोपातून निर्दोष सुटका झाली आहे. गेली १८ वर्षे ते तिहार येथील कारागृहात होते. कारावासात हिंदु धर्मातील धर्मग्रंथ गीता आणि उपनिषदांनी साथ दिल्याची कबुली सुहैब इलियासी यांनी प्रसार माध्यमांना दिली. 

 
"कारागृहात असताना मी नियमितपणे नमाज पठण करायचो. पण त्याचबरोबर भगवद्गीता आणि उपनिषदे वाचण्याचा मी निर्णय घेतला. गीता आणि उपनिषदांच्या वाचनामुळे मला मन:शांती लाभली." असे सुहैब यांनी आवर्जून सांगितले. सुहैब इलियासी हे ५२ वर्षांचे असून ते स्वत:ला एक धर्मपरायण मुस्लिम मानतात.
 
२००० साली सुहैब यांच्या पत्नी अंजूच्या हत्येप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु सुहैब यांनी पत्नी अंजूची हत्या केली नसून अंजूने आत्महत्या केली होती हे सिद्ध झाले आहे. ५ ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित करण्यात आले आणि त्यांची कारवासातून सुटका करण्यात आली. “मला दोषी ठरविण्यात आले होते; तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. परंतु न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता. सत्याचा नेहमीच विजय होतो.” असे सुहैब म्हणाले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@