काँग्रेसींना ‘तीच चव’ हवी!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |

 

 

 आताच्या कमल नाथ यांच्या चव्हाट्यावर आलेल्या विधानांवरून काँग्रेसी नेते नेमकी कोणत्या पेयासह चर्चा करतात, याची सुरस कल्पना कोणी केली तर ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच मोदींनीचाय पे चर्चाआयोजित केली तेव्हा कमल नाथादी काँग्रेसी नेते कायराहुल मूत्र पे चर्चाकरत होते का?, हा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे दिसले आणि गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर राहुल गांधी काँग्रेसबाबतच्या रंगीढंगी जोक्स-पोस्ट ओसंडून वाहू लागल्या.
 
 

वर्षानुवर्षे गांधी परिवाराच्या खरखट्यावर जगणार्‍या काँग्रेसी नेत्यांचीऔकातनुकतीच जगाच्या वेशीवर टांगली गेली. स्वतःची इभ्रत सांभाळता येणार्‍या काँग्रेसींनी देशातल्या जनतेच्या स्वाभिमानाचाही कचरा केल्याचे एका ध्वनिचित्रफितीतून उघड झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अप्पर सचिव आर. व्ही. एस. मणी यांनीहिंदू टेररनावाचे पुस्तक लिहिले असून, त्यासंबंधी त्यांनी प्रसारित केलेल्या ध्वनिचित्रफितीतूनच काँग्रेसी नेत्यांची हीन दर्जाची मानसिकता सर्वांसमोर आली. सदर ध्वनिचित्रफितीत इशरत जहाँ या दहशतवादी मुलीच्या चकमक प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव गोवण्यासाठी काँग्रेस नेते कमल नाथ यांनी आपल्यावर दबाव आणल्याचे मणी यांनी म्हटले. विशेष म्हणजे कमल नाथ एवढे बोलूनच थांबले नाहीत, तर गांधी घराण्याप्रती आपली निष्ठा दाखवत त्यांनी मणी यांच्याशी अतिशय लज्जास्पद भाषेत संवाद साधला. सदैव काँग्रेसी संस्कृतीची कवने गाणार्‍या भाटांचासभ्यपणाही कमल नाथ यांच्या भाषेवरून दिसला. कमल नाथ यांचा दबाव झुगारून, “मी नरेंद्र मोदींचे नाव इशरत प्रकरणात घालणार नाही,” असे मणी यांनी सुनावताच घराण्याच्या गुलामाने आपली गुलामी किती घरंदाज आहे, ते दाखवले. “बाहेर लोक राहुल गांधींचे मूत्र पिण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही इशरत चकमक प्रकरणात नरेंद्र मोदींना अडकविण्यासारख्या छोट्याशा कामासाठी तयार होत नाहीत,” असे म्हणत कमल नाथ यांनी मणी यांच्यावर दबाव आणत बदमाशगिरीची हद्द केली. शिवाय हिंदू दहशतवादाचे भूत उभे करण्यासाठीही कमल नाथ यांनी आर. व्ही. एस. मणी यांना गळ घातली. पणतुम्हा लोकांना मूत्राची चव माहिती असेल, तुम्ही प्या... मी मात्र सत्यासोबत उभा राहीन,” असे खडसावत मणी यांनी कमल नाथ यांच्या शब्दांना झिडकारले. इथे हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी कोणत्याही थराला जाणार्‍या काँग्रेसी प्रवृत्तीचाच मणी यांच्या खुलाशामुळे पर्दाफाश झाला असून गेल्या काही काळातील राहुल गांधींच्या मंदिरवार्‍या फक्त मतांचे दान आपल्या कटोर्‍यात रिते व्हावे, म्हणूनच होत्या, हेही सिद्ध होते.

 

भारतात हजारो वर्षांपासून बहुसंख्येने असलेल्या हिंदू समाजाची राष्ट्रीयत्वाची भावना सुपरिचित आहे. इथल्या हिंदूंच्या मनातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे मानसिक खच्चीकरण केले की, त्याच्या मनात अपराधगंड तयार होतो. हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले की, मुस्लिमांची मुस्लिमांतल्या धार्मिक नेत्यांची मर्जी सांभाळली जाते. ज्यातून काँग्रेस त्यापासून फुटून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांची चळवळ सत्ता बळकट होते. हिंदू दहशतवादाची भाकडकथा याच सत्ताबळकटीकरण षड्यंत्राचा भाग होती. बहुसंख्य समाज एकदा अपराधभावाने जगायला लागला की, तो हिंदुत्वनिष्ठांच्या मागे जाणार नाही पुढे अल्पसंख्य समाजाचे लांगूलचालन करत तहहयात सत्ताधीश होण्याचा आपला मार्ग निष्कंटकपणे तयार होईल आणि पुन्हा आपल्याविरोधात कोणी ब्रही काढू शकणार नाही, अशी त्यामागची योजना होती. म्हणूनच हिंदू दहशतवाद कुठेही अस्तित्वात नसताना माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदूंना गुन्हेगार ठरवण्यासाठी आकाशपाताळ एक केले. १९९० पासून काश्मीर खोर्‍यात सुरू झालेल्या दहशतवादी कारवायांना या लोकांनी कधीही धर्माचे नाव वा रंग दिला नाही, उलट दहशतवादाला धर्म नसतो, असे बोंबलत राहणेच पसंत केले, पण बालपणापासून हिंदूद्रोहाचीच शिकवण मिळालेल्या करंट्यांनी जे सिद्धही झालेले नाही, त्या प्रकरणात हिंदू दहशतवाद भगव्या दहशतवादाच्या नावाने ठणाणा केला. हिंदूद्वेषाची लागण झालेल्या या मंडळींनीच पुरावे नसतानाही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, स्वामी असीमानंदांसह कितीतरी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. न्यायालयाने या तिघांनाही बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून मुक्त करेपर्यंत त्यांना ८-९ वर्षे याच लोकांनी तुरुंगात सडवले. स्वतःला जानवेधारी हिंदू म्हणून सिद्ध करण्यात गुंतलेल्या राहुल गांधींसह काँग्रेसची काळी बाजूच यातून झगझगीतपणे समोर येते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळीचाय पे चर्चानावाने थेट जनतेशी संवाद साधण्याचे नवेच अस्त्र उपसले होते. त्याला कारणही गांधी कुटुंबीयांची हुजरेगिरी करत आयुष्यभर रा. स्व. संघ, भाजप हिंदूविरोधी विखार जागवणार्‍या मणीशंकर अय्यर यांचे विधानच होते. “वो चायवाला...” असे हिणवत नरेंद्र मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकीत अय्यर यांनी केले होते. मोदींनी तरी असंख्य भारतीयांना आवडणार्‍या चहा या पेयाचीच संवाद साधण्यासाठी निवड केली होती, ज्याची खिल्ली काँग्रेसी उडवत होते. मात्र, आताच्या कमल नाथ यांच्या चव्हाट्यावर आलेल्या विधानांवरून काँग्रेसी नेते नेमकी कोणत्या पेयासह चर्चा करतात, याची सुरस कल्पना कोणी केली तर ते वावगे ठरणार नाही. म्हणूनच मोदींनीचाय पे चर्चाआयोजित केली तेव्हा कमल नाथादी काँग्रेसी नेते कायराहुल मूत्र पे चर्चाकरत होते का?, हा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाल्याचे दिसले आणि गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर राहुल गांधी काँग्रेसबाबतच्या रंगीढंगी जोक्स-पोस्ट ओसंडून वाहू लागल्या. आपली पप्पूगिरी दाखवून देशात स्वतःची शोभा करून घेणार्‍या राहुल गांधींची कमल नाथ यांच्या विधानामुळे सर्वत्रच छी-थू होऊ लागली. याच लोकांनी कित्येकवेळा हिंदूंमध्ये पवित्र मानल्या गेलेल्या गोमूत्राची टवाळी करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नव्हती. काँग्रेसींच्या हिंदूद्वेषाचाच हा नमुना आणि हिंदू समाजाकडून आता राहुल गांधींसह काँग्रेसवर केली जाणारी टीका ही त्याचीच प्रतिक्रिया. दुसरीकडे या सर्वच प्रकरणावरून दीर्घकाळ देशाच्या सत्तेवर राहिलेली काँग्रेस त्या पक्षाचे नेते किती मोठ्या हिंदूद्वेषाने पछाडलेले होते, हेही समोर आले. 2014 साली काँग्रेसींच्या याच हिंदूद्वेषाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या डावाला ओळखून तमाम जनतेने काँग्रेसला घरी बसवले. अजूनही आपल्या हिंदूद्वेषाच्या अजेंड्यापासून ढळलेल्या काँग्रेसला तोच अनुभव पुन्हा एकदा येईल, हे नक्की.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@