श्री महागौरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
 
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।

महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥

 

आई दुर्गाजीचे आठवे रूप महागौरी होय. याच नावाने ते प्रसिद्ध आहे. यांचा रंग पूर्णपणे गौरवर्णीय होय. या गौरवर्णाची उपमा शंख, चंद्र व कुन्द फुलामुळे दिलेली आहे. यांचे वय वर्ष आठ मानले आहे. अष्टवर्षा भवेद्गौरी या शुभ्र वस्त्र परिधान करतात. या शुभ्र रंगाचेच दागिने परिधान करतात. यांचे वाहन वृषभ (बैल) असून, यांच्या वरच्या बाजूचा उजवा हात उभयमुद्रा स्थित असून, खालच्या बाजूच्या हातात त्रिशूल आहे. यांच्या डाव्या हातात डमरू आहे, तर खालच्या डावा हातावर मुद्रा स्थित आहे. यांची मुद्रा (रूप) अत्यंत शांत व सुंदर आहे. आपल्या पार्वतीरूपात भगवान शंकरांना पतीरूपात प्राप्त करण्यासाठी यांनी अतिशय कठोर तपश्चर्या केली. यांची प्रतिज्ञा होती की, ‘प्रियेऽहं वरदं शम्शुं नान्यं देवं महेश्वरात’. गोस्वामी तुलसीदासाच्या अनुसार यांनी भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर संकल्प केला होता.

 

जन्म कोटि लगि रगर हमारी।

बरहूँ संभु न त रहउँ कुँआरी॥

 

कठोर तपश्चर्येमुळे संपूर्ण शरीर काळे पडले. यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न आणि संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी गंगेच्या पवित्र पाण्याने मळ धुऊन टाकला, त्याबरोबर विद्युतप्रेम समान अत्यंत देदीप्यमान व धवल कांतियुक्त शरीर गौर झाले. त्यामुळे महागौरी हे नाव संबोधले गेले. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा-प्रार्थना करण्याचे विधान आहे. याची शक्ती अफाट व सद्य फलयुक्त आहे. यांच्या उपासनेमुळे सर्व पाप, दु:खे धुतली जातात. भविष्यात पाप, संताप, दैन्य, दु:ख जवळही फिरकत नाही. साधक सर्वप्रकारे पवित्र व अक्षम पुण्याचा अधिकारी होतो. आई महागौरीचे ध्यान-स्मरण, पूजा-प्रार्थना भक्तांकरिता सर्वाधिक कल्याणकारी असते. मनास अनन्य भावासहित एकनिष्ठ होऊन सतत ध्यान, जप करावयास पाहिजे. यामुळे सर्व कष्ट दूर होऊन जातात. यांच्या उपासनेमुळे कठिणातील कठीण कार्य सफल होते. यांच्या पायाजवळ शरण जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. पुराणात यासंबंधी वर्णन आढळते. या मनुष्याला सत्वृत्तीकडे प्रेरित करतात, असत्याचा विनाश करतात. म्हणूनच आपण सर्वांनी अनन्य भावाने सदैव यांना शरणदास म्हणूनच पूजले पाहिजे.

 
-  पुरुषोत्तम काळे 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@