होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |


 


औषधाची मात्रा ही बाहेरून ऊर्जेचादाब देऊन त्यातील संभाव्य ऊर्जा म्हणजेच ‘Potential energy’ही वाढवली जाते. औषधाच्या बनलेल्या मात्रेला ऊर्जा दिल्यामुळे त्यातील अणूंमध्ये असलेली ‘स्थिर ऊर्जा’ (static energy)ही उद्दीपित होते. अणू व रेणू यांची हालचाल वाढून संभाव्य ऊर्जा वाढीस लागते.

 

औषध निर्मिती व मात्रेची परिमाणे होमियोपॅथीमध्ये सर्व औषधे ही संपूर्णपणे नैसर्गिक तत्त्वांपासून बनलेली असतात. निसर्गामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या अनेक गोष्टींपासून होमियोपॅथीची औषधे बनतात. वनस्पतींपासून बनलेली ‘वनस्पतीजन्य औषधे’ (Plant kingdom), तर प्राण्यांपासून बनलेली ‘प्राणिजन्य औषधे’ (animal kingdom) उदा. सापाच्या विषापासून,गाईच्या दुधापासून इत्यादी प्राणिजन्य स्रोतांपासून होमियोपॅथीमध्ये औषधे बनतात. पृथ्वीच्या पोटातील विविध खनिजांपासून ‘खनिजजन्य औषधे’ बनतात, त्याला ‘mineral kingdom’ म्हणतात. सर्व औषधी वस्तूंवर होमियोपॅथीमध्ये एक शास्त्रशुद्धरित्या प्रक्रिया केली जाते, तिलाच ‘औषधनिर्मिती’ व ‘मात्रेचे परिमाण’ (Doctrine of Drug dynamization) असे म्हणतात. ‘होमियोपॅथीक डायनामायझेशन’ प्रक्रिया ही अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्यात नैसर्गिक पदार्थांमधील औषधीतत्त्वे वर आणली जातात व ती वाढवली जातात. उदा.जसे आपण वर पाहिले की, प्राणिजन्य पदार्थांमध्ये सापाचे विष हेदेखील येते. कारण, या त्या विषामध्ये अनेक औषधी तत्त्वे असतात; जी शरीराच्या अनेक असाध्य व्याधींवर अतिशय परिणामकारकरित्या कार्य करून त्या व्याधी नष्ट करू शकतात. परंतु जर हे सापाचे विष असेच म्हणजेच काहीही प्रक्रिया न करता जर माणसाला दिले, तर त्यामुळे विषाचा विपरीत परिणाम होईल. म्हणूनच हे ‘Drug dynamization’ केले जाते. औषधी पदार्थांतील विषारी गुणधर्म काढून, त्याचे उपकारी गुणधर्म वाढवले जातातव त्यानंतर त्या तयार झालेल्या औषधांची ‘विविध शक्तीं’मध्ये (power) निर्मिती केली जाते. या शक्ती वाढवविण्याच्या प्रयोगाला ‘पोटेंटायझेशन’ (Potentization)असे म्हणतात. पोटेंटायझेशन म्हणजेच औषधाची शक्ती वाढविण्याची प्रक्रिया. औषधाची मात्रा ही बाहेरून ऊर्जेचादाब देऊन त्यातील संभाव्य ऊर्जा म्हणजेच ‘Potential energy’ही वाढवली जाते. औषधाच्या बनलेल्या मात्रेला ऊर्जा दिल्यामुळे त्यातील अणूंमध्ये असलेली ‘स्थिर ऊर्जा’ (static energy)ही उद्दीपित होते. अणू व रेणू यांची हालचाल वाढून संभाव्य ऊर्जा वाढीस लागते. या ऊर्जा वाढविण्याच्या प्रक्रियलाच ‘पोटेंटायझेशन’ असे म्हणतात.

 

ही दोन प्रकारे क्रिया करता येते.

 

) विघटन पद्धत (Trituration) :- जेव्हा औषधी पदार्थ हा न विरघळणारा असतो तेव्हा विघटन पद्धतीने त्यातील औषधी गुणधर्म वाढवले जातात.

 

) सकस्शन :- या प्रक्रियेत विरघळणारे पदार्थ हे वापरलेजातात. या प्रक्रियांमध्ये रुग्णाला औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, अशा मात्रेत औषधे बनवली जातात. म्हणूनच शास्त्रशुद्ध होमियोपॅथीचा रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट परिणाम अतिशय सकारात्मक होतो.

 

तसेच होमियोपॅथीच्या तत्त्वांप्रमाणे ‘चैतन्यशक्ती’ ही गतिशील असते व अशा ‘गतिशील चैतन्यशक्ती’ला बळ देण्यासाठी औषधेही तशीच गतिशील असावीलागतात. (Dynamic in nature) त्यामुळे इतर औषधशास्त्रांप्रमाणे मोठमोठ्या गोळ्या न देता लहान गोडगोळ्यांमधून औषध घालून दिले जाते की, जे अतिशय शक्तिशाली असते. काही औषधे ही त्यांच्या मूळरुपात असताना औषधी गुणधर्म दाखवत नाहीत. परंतु, त्यांच्यावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया केल्यावर मात्र ही औषधे त्यांचे औषधी गुणधर्म दाखवू लागतात. या ‘पोटेंटायझेशन’ नंतर औषधांची action म्हणजेच परिणाम हे फार खोलवर जाऊन होतात. औषधाचे परिणाम खूप काळापर्यंत टिकून राहतात आणि प्रदीर्घ काळापर्यंत औषधेही चांगली राहतात. संभाव्य ऊर्जा व गतिशीलता या औषधी गुणधर्मांमुळे माणसाच्या मनावरही औषधे अत्यंत सकारात्मक व परिणामकारकरित्या कार्य करतात.

 
 - डॉ. मंदार पाटकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@