परिस्थितीतून घडली यशस्वी उद्योजिका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |
 
 
 
दिल्लीतील एक सामान्य परिवार, पैशाच्या चणचणीमुळे हलाखीचे दिवस काढत होता. मात्र, घरातल्या मुलीने परिवाराच्या संपन्नतेचे स्वप्न पाहत एक यशस्वी उद्योजिका म्हणून नाव कमावले. त्या कृष्णा यादवची कहाणी...
 
 

दिल्लीतील प्रसिद्ध लोणचे बनविणार्याश्री कृष्णा पिकल्सची सर्वेसर्वा कृष्णा यादव एक सफल उद्योजिका म्हणून नावारुपाला आली ती केवळ तिच्यातील जिद्दीच्या जोरावर. परिस्थितीने घेतलेल्या सर्व अग्निपरीक्षा तिने पार पाडत केवळ स्वत:चा उद्योगच उभा केला नाही, तर खचलेल्या कुटुंबाची मान स्वकर्तृत्वाने उंच करायला शिकवली. ‘कृष्णाला मिळालेली ही यशाची चव इतक्या सहजासहजी मुळीच मिळालेली नाही. कृष्णा यादव मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहर गावात राहणारी. तिच्या कुटुंबाला १९९५ ते १९९६ या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. याच काळात तिचा पती गोवर्धन याची नोकरीही गेली. यामुळे तो सतत नैराश्यात असायचा. यातून मार्ग काढण्यासाठी एका खमक्या भारतीय स्त्रीप्रमाणे तिने कुटुंबाची जबाबदारी उचलायचे ठरवले. कुटुंबाला मानसिक पाठबळ दिले, विश्वास दिला यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला आणि एका मित्राकडून पाचशे रुपये घेऊन थेट दिल्ली गाठली. शेवटी निराशाच पदरी पडली. दिल्लीतही नोकरी मिळाली नाही. खानपूर येथे कमांडेट बी. एस. त्यागी यांच्या एका बंगल्याची देखभाल करण्याचे काम कृष्णाला मिळाले आणि तिच्या कुटुंबाची तात्पुरती व्यवस्था झाली.

 

कमांडेट त्यागी यांच्या बंगल्यात एका कृषिविज्ञान केंद्राचे काम सुरू होते. त्यात बोरे आणि आवळ्याची झाडे लावली होती. मात्र, बाजारात त्यांना पुरेशी किंमत मिळाली नाही. वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार त्यागी यांनी प्रोसेसिंग फूडची निर्मिती करण्याचे ठरवले. यातूनच पुढे एक यशस्वी उद्योजिका होण्याचा कृष्णा यादव हिचा प्रवास सुरू होणार होता. केवळ बंगल्याची देखभाल करणारी कर्मचारी कृष्णा हिला परिवारासह घरखर्चाचीही चिंता होतीच. या केंद्रात आता खाद्यपदार्थांवर प्रक्रिया करून त्यापासून मुरांबा, लोणची आदी पदार्थांची बाजारात विक्री होऊ लागली. कृष्णा हिने २००१ साली कृषिविज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सलग तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तीन हजार रुपयांची गुंतवणूक करून १०० किलो आवळ्याचे आणि पाच किलो मिरचीचे लोणचे तयार केले. या पहिल्या व्यवहारात तिला पाच हजार २५० रुपयांचा नफा मिळाला. पहिल्या कमाईच्या जोरावर मिळालेल्या आत्मविश्वासाने आणखी मोठे पाऊल उचण्याचा निर्णय तिने घेतला. मात्र, परीक्षा अजून संपलेली नव्हती. मिळालेल्या नफ्यातून त्यांनी आवळ्यापासून गोळ्या तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बाजारात हा माल कुणी खरेदी केला नाही आणि तिचे नुकसान झाले. मिळालेले सर्व पैसे यात लावले होते आणि सर्व बुडाले. ‘हार मानणेहे यशस्वी उद्योजकाचा एक गुण कृष्णामध्ये पहिल्यापासूनच होता. आणखी एक म्हणजे आपल्या चुकांपासून शिकण्याची वृत्ती म्हणजे अपयशाची कारणमीमांसा करणे. कृष्णानेही तेच केले. डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात केली. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उत्पादने बाजारात कसा टिकाव धरतील, त्यांच्या मागणीत कशी वाढ होईल, याचाही विचार केला आणि दर्जेदार उत्पादने बाजारात आणली.

 

कृष्णाचा पती गोवर्धन बाजारात उत्पादनांची विक्री करायचा. नजफगड येथे रस्त्यावर हातगाडी लावून त्यांनी सुरुवातीला विक्री केली. हळूहळू विक्री वाढत गेली. ग्राहकांचा विश्वास मिळविण्यात कृष्णा आणि गोवर्धन यशस्वी झाले. तिने पुन्हा आवळ्यापासून तयार होणारी विविध उत्पादने बनवली. लोणची, मुरांबा आणि पहिल्यांदा तोट्यात गेलेल्या आवळ्याच्या गोळ्यांचे उत्पादनही नव्या पद्धतीने सुरू केले. लोकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद, विक्रीतील वाढ आणि गाठीशी असलेला अनुभव यामुळे तिने पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या फॅक्टरीमध्ये जवळपास ५०० क्विंटल फळे आणि भाज्यांवर विविध उत्पादनांसाठी प्रक्रिया केली जाते. वार्षिक उलाढालही एक कोटींवर पोहोचली आहे. एकेकाळी पतीला व्यवसाय गमावावा लागल्यानंतर धाडसाने पुढे येत स्वतःचा व्यवस़ाय उभी करणारी कृष्णा शेकडो लोकांना रोजगार देत आहे. २००६ मध्ये तिने आईएआरआईमध्ये पोस्ट हार्वेस्ट प्रौद्योगिकीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यात तिने फळांवर बिगररासायनिक प्रक्रियेतून रस बनवण्याची माहिती घेतली. त्यानंतर आईएआरआईसह जांभूळ, लिची, आंबा, स्ट्रॉबेरी आदींचे रस बनवण्याचा करार केला. रस्त्यावर विक्री करणार्या हातगाडीपासून ते एका कंपनीच्या मालकीपर्यंतचा हा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. आज चार मजल्यांच्या फॅक्टरीत नवनवीन अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. कृष्णा यादव हे दिल्लीतील उद्योजकांमध्ये मोठे नाव आहे. तिला आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानितही केले आहे. मार्च, २०१६ रोजी भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे दिला जाणारानारीशक्ती सन्मान २०१५हा पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये हरियाणा सरकारने तिलाको इनोवेटीव्हआईडियासाठी राज्याचीपहिली चॅम्पियन किसान महिलाहा पुरस्कार दिला. यापूर्वी व्हायब्रन्ट गुजरात संमेलनात २०१३ रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५० हजारांचा धनादेश देऊन गौरव केला. २०१० मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही एका कार्यक्रमात बोलवून तिच्या यशाच्या कहाणीचा उल्लेख करून तिचा गौरव केला होता.

-तेजस परब 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@