अलाहाबाद नाही 'प्रयागराज' म्हणायचं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2018
Total Views |



अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याची योगी सरकारची घोषणा


उत्तर प्रदेश : अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज करण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यामुळे आता ४४४ वर्षानंतर पुन्हा एकदा अलाहाबाद शहराला आपले जुने नाव मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अलाहाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी मागणी होत होती. पुराणामध्ये देखील अलाहाबादचे नाव प्रयागराज असल्याचा उल्लेख आहे. याचमुळे २०१७ साली योगी सरकार आल्यानंतर नामांतराचा विषय गांभीर्याने घेत शहराचे नाव प्रयागराज करण्याची घोषणा केली.

 

१५ जानेवारी २०१९ पासून अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहराचे नामांतर होणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. नामांतरास राज्यपाल राम नाईक यांची मंजुरी मिळाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. दरम्यान, योगी सरकारने यापूर्वी मुघलसराय या रेल्वेस्थानकाचे नाव बदलले होते. मुघलसराय नाव बदलून पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे नामांतर केले होते.

 

पौराणिक महत्व

 

मिळालेल्या माहितीनुसार, 'रामचरित मानस'मध्ये देखील प्रयागराज याच नावाने शहराचा उल्लेख आहे. याच शहरात प्राचीन काळी राजांचा अभिषेक होत असल्याचा देखील 'वाल्मीकि रामायण'मध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर सर्वात प्राचीन असलेल्या मत्स्य पुराणच्या १०२ ते १०७ अध्यायामध्ये या शहराचा उल्लेख प्रयाग असा केलेला आहे. त्यामध्ये असं म्हटले आहे की, प्रयाग शहरातून गंगा, यमुना नदी वाहते, हे प्रजापतीने शहर आहे.

 

अकबराने बदलले नाव

 

अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन ऐतिहासिक पुस्तकाच्या संदर्भानुसार १५७४ साली अकबराने प्रयागराज नाव बदलून अलाहाबाद असे ठेवल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्याने या ठिकाणी किल्ला बांधून या नव्या शहराला अलाहाबाद असे नाव दिले, यापूर्वी या शहराला प्रयागराज याच नावाने ओळखले जायचे.

 

दरम्यान, नामांतराच्या प्रश्नावरून उत्तर प्रदेशचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. अनेकांनी या नामांतराचे स्वागत केले आहे तर विरोधकांनी मात्र सरकारवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे योगी सरकारने नामांतराची केलेली घोषणा सत्यात उतरते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@