पाकिस्तानकडून भारताला 'सर्जिकल स्ट्राईक'ची धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
लंडन : दोन वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानतच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. परंतु भारताने केलेल्या या कामगिरीची सल अजूनही पाकिस्तानच्या मनात आहे. ‘पाकिस्तान भारताविरुद्ध १० सर्जिकल स्ट्राईक करेल’ अशी धमकी पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारताला दिली आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्विसेच्या जनसंपर्क विभागाचे आसिफ गफूर हे प्रवक्ते आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बावजा यांच्यासोबत ते लंडन दौऱ्यावर होते. त्यावेळी परदेशातील प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही धमकी दिली.
 

भारताने पाकिस्तान विरुद्ध एक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान १० सर्जिकल स्ट्राईक करेल. असे गफूर म्हणाले. असे पाकिस्तान रेडिओने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या विरोधात कोणताही कट रचण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तान जशाच तसे उत्तर देईल. पाकिस्तानच्या क्षमतेवर संशय घेऊ नये. भारताने एक सर्जिकल स्ट्राईक केला. पण असे १० सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकिस्तानची क्षमता आहे.” असेही गफूर म्हणाले.

 

पाकिस्तानमध्ये जुलैमध्ये निवडणुका होतील. या निवडणुका सुरक्षित आणि पारदर्शक असतील. असा दावा गफूर यांनी केला. तसेच पाकिस्तानमध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर सप्रयत्न करत आहे. निवडणुकांदरम्यान जर कोणी गोंधळ घालणार असेल तर त्याला पुराव्यासहित वेळीच समोर आणावे. पाकिस्तानचा आता विकास झाला असून तेथे पूर्णपणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पाकिस्तानी मीडियाने आता चांगल्या गोष्टीसुदधा दाखवायला हव्यात.” असेही गफूर यावेळी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@