श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तळोद्यात दुर्गा दौड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |
 
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तळोद्यात दुर्गा दौड
 
तळोदा, १३ ऑक्टोबर
श्रीशिवप्रतिष्ठाण हिन्दुस्थान, तळोदा विभागाच्या वतीने श्री दुर्गामाता दौड प्रारंभ झाला असुन यंदा नवरात्री उत्सवामध्ये या दुर्गा दौडचे तळोदा तालुका विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
 
घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत ही दुर्गादौड दररोज पहाटे ५:३० वाजेपासून शहरातील विविध भागातून भगव्या ध्वजाची पुजा करुन, ध्येयमंत्र-प्रेरणामंत्र घेऊन जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जयच्या घोषणेने या दुर्गादौडीस प्रारंभ करण्यात येतो.
१२ ऑक्टोंबर रोजी सोनार वाडा, मेन रोड तळोदा या ठिकाणाहुन दौडीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका प्रतिक्षा ठाकुर, आनंद सोनार, जगदीश परदेशी, मुकेश बिरारे, गणेश चौधरी, शिवम सोनार, कार्तिक शिंदे, निखील सोनार, स्वप्नलि चौधरी, विजय सोनवणे, निखील आघाडे, आकाश भोई, सचिन भोई, क्रिष्णा सोनार सह शेकडो धारकरी फेटे व वारकरी टोपी घालून या दौडीत सहभागी झाले होते. तरी रोज निघणार्‍या या दुर्गामाता दौडीत धर्मप्रमींनी, शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे युवराज चौधरी, किरण ठाकरे, पराग राणे यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@