कालरात्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
एकवेद्वी जपाकर्णपुरा नग्ना खारास्थिता।

लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलभ्यक्तशरीरिणी॥

 

आई दुर्गाजीच्या सातव्या स्वरूपाचे नाव कालरात्री असून, याच नावाने परिचित आहे. त्याच्या शरीराचा वर्ण अंध:काराप्रमाणे काळा असून, डोक्याचे केस विखुरलेले आहेत. गळ्यात विद्युतप्रमाणे चमकणाऱ्या माळा असून, तीन डोळे आहेत. हे तीन डोळे ब्रह्मांडसदृश्य गोल आहे. त्याच्या विद्युत (वीज)प्रमाणे चमकणारी किरणे नि:सृत होत असतात. यांच्या नाकावाटे श्वासोच्छ्वासाद्वारे अग्नीच्या भयंकर ज्वाळा बाहेर पडतात. यांचे वाहन गाढव (गर्दभ) होय. उजव्या बाजूचा वरचा हात वरमुद्रास्थित असून, सर्वांना वर प्रदान करतात. डाव्या बाजूच्या खालच्या बाजूचा हात अभयमुद्रेत स्थित आहे. डाव्या हाताच्या वरच्या हातात लोखंडी काटा असून, खालील हातात खङ्ग (कट्यार) आहे.

 

आई कालरात्रीचे रूप अत्यंत भयानक असून, त्या सदैव शुभफळ देण्यात माहीर आहेत. याचमुळे त्यांना ‘शुभंकरी’ असेही नाव आहे. याचमुळे भक्तांना कोणत्याही प्रकारे घाबरण्याचे कारण नाही. दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी कालरात्रीची उपासना करण्याचे विधान आहे. यादिवशी साधकाचे मन सहस्त्रारचक्रात स्थित असते. साधकाचे मन पूर्णपणे आई कालरात्रीच्या स्वरूपात असते. यांच्या साक्षात्कारामुळे पुण्य मिळते, तसेच सर्व पापांचे नाश करते. अक्षय पुण्यलोकांची प्राप्ती होते.

 

आई कालरात्री दुश्मनांचा नाश करते. राक्षस, दैत्य, दानव, भूत, प्रेत हे आईच्या फक्त स्मरणाने भयभीत होऊन पळून जातात. ग्रहबाधाही दूर करतात. यांच्या भक्तांना अग्निभय, जलभय, जन्तुभय, शत्रुभय, रात्रीचे भय इत्यादी कधीही होत नाही. यांच्या कृपेमुळे सदैव भय दूर होते. आई कालरात्री स्वरूप आपल्या हृदयात व्यवस्थित, एकनिष्ठ, एकाग्रतेने स्थापित करून उपासना करावी. यम, नियम, संयम यांचे पालन करणे आवश्यक होय. मन, वाचा, काया यांची पवित्रता पाळली पाहिजे. याच शुभंकरी देवी होय. याची साधना, उपासनेमुळे सर्वकाही शुभ होते. याची गणना (तुलना) करू शकत नाही. याचसाठी साधकाला सदैव यांचे नामस्मरण, पूजाअर्चा याचे भान असले पाहिजे.

- पुरुषोत्तम काळे
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@