नवी मुंबई विमानतळातील प्रकल्पबाधीतांच्या अनुदानात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |



नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी स्थलांतरीत होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना भूखंडांच्या वाटपासोबतच बांधकाम अनुदान व घरभाडे यांसारखे इतर लाभ देण्यात येत आहेत. विमानतळ प्रकल्प व पुनर्वसनबाधित दहा गाव समन्वय समिती तसेच प्रकल्पबाधितांनी बांधकाम अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणीनुसार सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेऊन ७ नोव्हेंबर पर्यत्त निष्कसित होणाऱ्या बांधकामांना प्रति चौरस फुट ५०० रुपये विशेष प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय सिडको मार्फत घेण्यात आला आहे.

 

सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने व समितीच्या मागणीनुसार ७ नोव्हेंबर पर्यंत निष्कासित होणाऱ्या बांधकामांना प्रति चौरस फुटास रूपये ५०० प्रमाणे विशेष प्रोत्साहन अनुदान तसेच घरभाडे धोरणाप्रमाणे देय होणारे १८ महिन्यांचे घरभाडे देण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धोरणानुसार त्रिपक्षीय करारनामा करताना संबंधित बांधकामधारकास अदा केलेले घरभाडे वसूल करण्याची तरतूद शिथिल करून यापुढे घरभाडे वसूल न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. सवलत करारनाम्यानुसार ७ जुलै रोजी एकूण विमानतळ क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्राचा ताबा कंपनीकडे देण्यात आला होता.

 

सदर करारनाम्यानुसार उर्वरित क्षेत्राचा ताबा दिनांक ७ नोव्हेंबर पर्यंत देणे आवश्यक आहे. त्यापूर्वी सर्व बांधकामे निष्कासित होणे आवश्यक असून, लोकप्रतिनिधी व समितीच्या मागणीनुसार सर्व बांधकामांना ५०० रुपये प्रमाणे विशेष प्रोत्साहन अनुदान व घरभाडे धोरणाप्रमाणे १८ महिन्यांचे घरभाडे देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणावर बांधकामे निष्कासित होतील. परंतु यासाठी प्रकल्पबाधित बांधकामधारकांना विशेष प्रोत्साहन अनुदान आणि १८ महिन्यांचे घरभाडे देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विमानतळ प्रकल्पबाधीतांसाठी ही अंतिम संधी असून, संबंधित बांधकामधारकांनी आपली बांधकामे त्वरित निष्कसित करुन उपरोक्त योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडको तर्फे करण्यात आल आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@