काश्मीरवरून गंभीर, अब्दुल्ला यांच्यात ट्विटर वॉर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |



नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये उडालेल्या चकमकीत दहशतवादी मन्नान वाणी ठार झाला होता. यानंतर गौतम गंभीर याने यावर आपली प्रतिक्रिया ट्विटरवर दिली. "मन्नान वानीसारख्या स्कॉलरला पुस्तकं सोडून गोळ्या खाव्या लागल्या याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना पश्चात्ताप व्हायला हवा", असे लिहीत त्याने ओमर अब्दुल्लांसह इतर पक्षांना टॅग केले होते. यावर ओमर आणि गंभीरमध्ये शाब्दिक ट्विटर युद्ध रंगले. "मन्नान वाणीचा मृत्यू, आम्ही एका दहशतवाद्याला मारले आणि कट्टर स्वभावाच्या एका प्रतिभेला नष्ट केले." असे गंभीरने ट्विट केले होते. यावर ओमर अब्दुल्लांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी त्याचे प्रत्युत्तर दिले.

 

ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "या माणसाला (गंभीरला) मन्नानच घर ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा नकाशावर शोधता येणार नाही, गाव तर दूरच राहिले आणि हा काश्मिरी युवकांच्या हातात बंदूक का आली त्याची कारणे मांडतोय. गंभीरला काश्मीरबद्दल तितकीच माहिती आहे, जितकी मला क्रिकेटबद्दल." असे अब्दुल्ला म्हणाले. मैदानावर आपल्या आक्रमक पवित्र्यावरून नेहमी चर्चित राहणारा गंभीर कसा शांत बसेल. त्याने याचे उत्तर देण्यासाठी त्याने ट्विटमध्ये म्हंटले की, "अब्दुल्ला जी, तुम्ही तर नकाशाबद्दल बोलूच नका. काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची इच्छा बाळगून तुम्ही तर माझ्या देशाचा नकाशा बदलायला निघाला आहात. तुम्ही सांगा की तुम्ही आणि अन्य राजकीय पक्षांनी काश्मीरी युवकांसाठी आतापर्यंत काय केलं आहे?" यावर अब्दुल्लाही गप्प राहिले नाहीत. त्यांनी याच उत्तरही असेच दिले.

 

"गेल्या आठवड्यात माझ्या दोन सहकाऱ्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आहेत. माझ्या पक्षाने १९८८ पासून १ हजार कार्यकर्ते गमावलेत. मला राष्ट्रभक्ती आणि त्यागावर व्याख्यानाची गरज नाही, तेही अशा व्यक्तीकडून ज्याचा त्यागाशी सूतराम संबंध नाही." यापुढे ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "मी तुमच्यासोबत वाद घालू इच्छित नाही, ज्यांना राष्ट्रवाद आणि बलिदान माहित नाही, त्यांच्याशी मला चर्चा करायची नाही." त्यावर गंभीर उत्तरला की," तुम्ही एकटेच नाही, तुमच्यासारखे नेते आरसा दाखवला की असंच वागतात. म्हणून माझ्या देशाचं रक्त सांडत आहे. राष्ट्रवाद आणि त्यागासाठी खरं असणं गरजेचं आहे."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@