पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींची हत्या केली जाईल अशा आशयाचा मेल दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांना मिळाला आहे. हा मेल कोणी पाठवला? यामागे काय उद्देश याबाबत दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका असल्याचे दुसऱ्यांदा समोर आल्याने पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत.

 

आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अनेक ठिकाणी सभा व रॅली होणार आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी नुसार हा मेल पूर्वेकडील राज्यातून आसाम या ठिकाणाहून आल्याचे सांगितले. तसेच हा मेल एका सर्व्हरच्या माध्यमातून पाठवला आहे.

 

यापूर्वी देखील नक्षलवाद्यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती. दरम्यान, या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@