शिवसेना आमदारावर जीवघेणा हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |



मुंबई: मुंबईतील अणूशक्तीनगर मतदार संघाचे शिवसेना आमदार तुकाराम काटे यांच्यावर रात्री १२ वाजता काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मानखुर्द येथे महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३ कारशेड परिसरात हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

 

सध्या महाराष्ट्र नगर परिसरात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले. दिवसरात्र चालणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे स्थानिक रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मेट्रोचे काम थांबवण्यासाठी काते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. तेथून परतत असतानाच काते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. या हल्ल्यातून काते बचावले असले तरी त्यांचे सुरक्षारक्षक आणि अन्य दोन सहकारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@