कात्यायनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |



चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।

कात्यायानी शुभं देद्यादेवी दानवघातिनी॥

 

आई दुर्गाजीचे सहाव्या स्वरूपाने नाव कात्यायनी होय. कात्यायनी नाव संबोधनाची एक अतिशय सुंदर कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध ऋषी होते, त्यांना कात्य नावाचे चिरंजीव होते. तेदेखील महान ऋषी होते. या कात्य यांच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षी कात्यायन नावाने जन्मास आले. त्यांनी भगवती पराम्बांची पुष्कळ वर्षे कठोर साधना केली. त्यांची प्रबळ इच्छा होती की, आई भगवतीने माझ्याकडे मुलीच्या रूपात जन्म घ्यावा. त्यांची कठोर साधना आणि प्रबळ इच्छा फलित झाली. आई देवीने त्यांची प्रार्थना स्वीकार केली. काही काळानंतर महिषासुर नावाच्या राक्षसाने खूपच अत्याचार माजविला. ज्या वेळी खूपच अत्याचार झाला, त्या वेळी ब्रह्मा, विष्णू व शंकरजी या तिन्ही देवतांनी आपापल्या दिव्य तेजाने अंश देऊन महिषासुराच्या नाशाकरिता देवीची उत्पत्ती निर्माण केली. महर्षी कात्यायनाने सर्वप्रथम या देवीची पूजा केली. त्यामुळेच तिला कात्यायनी या नावाने संबोधिले जाते.

 

अजूनही एक गोष्ट ऐकावयास मिळते की, महर्षी कात्यायन यांच्याकडे मुलीच्या रूपात जन्मली होती. अश्विन कृष्ण चतुर्दशीस जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी तथा नवमी या दिवसापर्यंत यांनी कात्यायन महर्षींची पूजा मान्य करून महिषासुराचा वध केला. आई कात्यायनी अत्यंत शीघ्र फलस्वरूपिनी होय. भगवान कृष्ण पती मिळावा म्हणून व्रजच्या गोपीकांनी या देवीची मन:पूर्वक पूजा-प्रार्थना केली. कालिंदी यमुनेच्या तीरावर स्थानापन्न होती. या वज्रमंडळाच्या अधिष्ठात्री देवीच्या रूपात स्थापित होत्या. यांचे रूप भव्य-दिव्य होय. यांचा रंग सोन्यासारखा चमकत असे. या चार हाताच्या असून, आईच्या उजव्या बाजूच्या वरचा हात अभयमुद्रात असून, खालचा हात वरमुद्रा दर्शवितात. डाव्या बाजूच्या वरच्या हातात तलवार असून, खालील हातात कमळाचे फूल आहे. यांचे जंगलसम्राट सिंह वाहन आहे. दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी प्रामुख्याने यांची पूजा, प्रार्थना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते. योगसाधनेत आज्ञाचक्र अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान होय.

 

या चक्रस्थापन मनवाला साधकाने आई कात्यायनी देवीच्या चरणी आपले सर्वस्व अर्पण करावे. परिपूर्ण आत्मसमर्पणामुळे अशा भक्तांस सहज भावामुळे आई कात्यायनी निश्चित दर्शन देते. साधकाचे जन्माचे कल्याण होते. आई कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला अत्यंत सहजतेने अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चारही फळांची प्राप्ती होते. या भूमंडळी लोकात स्थिर राहून अलौकिक तेज उत्पन्न होते. रोग, शोक, संताप, भय सर्व नाश पावतात. जन्मजन्मांतराच्या पापांचा नाश होतो. हे सर्व होण्यासाठी आईच्या पूजा-प्रार्थनेशिवाय दुसरा मार्ग नाही. आईचा साधक निरंतर सानिध्यात राहिल्याने परमपदाचा अधिकारी होतो. सर्व भावपूर्ण आईच्या चरणी सदोदित राहिल्याने कल्याणच होते.

 
- पुरुषोत्तम काळे 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@