फेसबुकच्या ३ कोटी युजरचा डेटा हॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2018
Total Views |


 

 

न्यूयॉर्क : जगभरातील लोकांचा प्राण असलेल्या फेसबुक सोशल नेटवर्किंग साईटचा डेटा चोरीला गेल्याची बातमी असून यामुळे जगभरातील फेसबुक युजरमध्ये खळबळ माजली आहे. डेटा चोरीला गेल्याच्या बातमीला खुद्द फेसबुकने देखील कबुली दिली आहे. यामध्ये जवळपास कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरला असल्याचे फेसबुकने कबुली दिली. याप्रकरणी एफबीआय अधिक तपास करत असल्याची देखील त्यांनी सांगितले.

 

डेटा चोरी प्रकरणावर फेसबुकने सांगितले की, डेटा हॅक करण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकर परवानगी शिवाय अकाउंटमध्ये प्रवेश करून माहिती चोरू शकतात. अशाच प्रकारचा वापर कोटी ९० लाख युजरचा डेटा चोरण्यासाठी करण्यात आला आहे. चोरी झालेल्या युजर्सचे नाव, पत्ता, सर्च हिस्टरी आदी माहितीची चोरी झाली आहे.

 

यापूर्वी देखील करोड युजरचा डेटा हॅक झाल्याची माहिती उघड झाली होती. त्याला देखील फेसबुकने दुजोरा दिला होता तसेच फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफी देखील मागितली होती. दरम्यान, गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने युजरच्या माहितीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@