पद्म पुरस्कारासाठी ऐतिहासिक नामांकने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : २०१९ साली दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी तब्बल ५० हजार नामांकने प्राप्त झाली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडे ही नामांकने दाखल झाली असून २०१७ च्या तुलनेत यावर्षी ४० टक्के अधिक नामांकने मिळाली दाखल झाली आहेत. पद्म पुरस्कारासाठी नाांमांकने पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर पर्यंत होती. यातून निवडलेल्या व्यक्तींच्या नावाची घोषणा प्रजासत्ताक दिनी केली जाणार आहे.

 

विज्ञान, उद्योग, कला, शिक्षण, साहित्य, आदी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, या पुरस्कारासाठी २०१६ पासून ऑनलाईन नामांकने पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाल्या पासून विक्रमी नामांकने यायला लागली आहेत. २०१६ साली १८,७६८, २०१७ साली ३५,५९५ तर यावर्षी ऐतिहासिक म्हणजे ४९,९९२ मानांकन दाखल झाली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@