४८ तासांत जगभरातील इंटरनेट ठप्प होणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |



नवी दिल्ली : मानवी जीवनातील विविध व्यवहार सुलभ गतिमान करणारी इंटरनेट सेवा आज कित्येकांच्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग बनली आहे. मात्र, ही इंटरनेट सेवा शुक्रवार शनिवार अशा ४८ तासांच्या दरम्यान जगभरात अनेक ठिकाणी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास त्या त्या वेळी सुरू असलेले अनेक महत्वपूर्ण व्यवहारदेखील ठप्प मोठी नामुष्की निर्माण होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

 

एका युरोपियन प्रसारमाध्यमाने याबाबतच्या प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे शुक्रवार सकाळपासून जगभरात खळबळ उडाली आहे. या वृत्तानुसार, या दोन दिवसांत मुख्य डोमेन सर्व्हरची दैनंदिन इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईन्ड नेम्स अँड नंबर्स (आयसीएएनएन) या डोमेन आणि आयपी अॅड्रेसची नोंदणी करणाऱ्या संस्थेने डोमेन नेम सिस्टीम अर्थात डीएनएसच्या सुरक्षिततेसाठी काही तांत्रिक उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामामुळे इंटरनेट सेवा खी काही सर्वत्र पूर्णपणे बंद पडणार नसून काही ठिकाणी काही इंटरनेट वापरकर्त्यांना काही काळासाठी इंटरनेट सेवा उपलब्ध होणे, किंवा त्याची अपेक्षित गती मिळणे . परिणाम उद्भवू शकतात, असेही तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, याबाबतच्या काही प्राथमिक चाचण्या आम्ही केल्या असून त्यामधूनदेखील असे कोणतेही मोठे नुकसान होणार नसल्याचा दावा आयसीएएनएनने केला आहे.

 

कम्युनिकेशन रेग्युलेटरी ऑथोरिटी (सीआरए) या संस्थेने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, सुरक्षित, स्थिर आणि लवचिक डीएनएसकरिता हे काम हाती घेण्यात आले आहे. इंटरनेट सेवा पुरवठादार या काळातील बदल अडचणींसाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज नसल्यास त्यांच्या इंटरनेट वापरकर्त्यांना याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. परंतु, हा त्रासही सिस्टीम सिक्युरिटी एक्स्टेंशन्सद्वारे टाळता येऊ शकतो, असेही सीआरएमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. आता या क्षेत्रातील तज्ज्ञ जरी फारशी चिंता करण्यास सांगत असले तरीही आज प्रतीसेकंदागणिक इंटरनेटद्वारा जगभरात कानाकोपऱ्यात होत असलेले महत्वाचे मोठमोठे व्यवहार पाहता अशाप्रकारे इंटरनेट सेवेत व्यत्यय आल्यास किती मोठा फटका बसेल, हे शुक्रवार शनिवारीच स्पष्ट होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@