संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण; विवेक विचार मंचातर्फे निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |
 

पुणे : छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक लिखाण करणाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ‘विवेक विचार मंच’च्या वतीने करण्यात आली. सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ हे पुस्तक सर्व शिक्षा अभियानातून त्वरित मागे घ्यावे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी या मंचातर्फे करण्यात आली. याबाबत मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत व कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी पुणे पोलिसांना निवेदन दिले.

 

सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिण्यात आला. हा अतिशय संतापजनक व निंदनीय प्रकार असल्याचे सांगत त्यांनी निषेध केला. त्याचबरोबर या पुस्तकाच्या लेखिका शुभा साठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत ज्यांनी हे पुस्तक समाविष्ट केले, त्यांची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@