पाच वर्षांत करदात्यांची संख्या दुप्पट होईल : जेटली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत प्रत्यक्ष करदात्यांची संख्या दुप्पट होतील, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यावर प्रत्यक्ष करदात्यांची संख्या ही ३.५ कोटी इतकी होती. त्यात दरवर्षी करसंकलनातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष करदात्यांची संख्या दुप्पट होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

ते म्हणाले, “सरकारने पाच वर्षांत कर संकलनवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. काळ्या पैशांविरोधातील लढाई मोहिम, कर दात्यांसाठी सवलत, कर आकारणीसाठीच्या उत्पन्नाच्या मर्यादा याचा परिणाम कर संकलनवाढीवर होत आहे.” कॅगच्या २९व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. पाच वर्षांपूर्वी करभरणा करणाऱ्यांची संख्या केवळ ३ कोटी ५० लाख होती, गेल्या वर्षभरात हा आकडा ६ कोटी ८६ लाखांवर पोहोचला आहे. मोदी सरकारच्या पाचव्या वर्षअखेरीस करदात्यांची संख्या ७ कोटी ५० लाख इतकी होईल, असा अंदाज जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. जेटली यांनी यासाठी डिजिटलायझेशन कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “डिजिटल व्यवहार, पारदर्शक प्रणाली आणि ई-व्यवहारांचा वाढत्या वापरामुळे करचोरी आदींसारखे प्रकार घटले आहेत. सरकारने सुरू केलेल्या काळ्यापैशाविरोधातील लढाईचाही हा मोठा विजय आहे. यामुळे दरवर्षांत १५ ते २० टक्के करसंकलन वाढणार आहे.”, असा दावाही त्यांनी केला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@