दिमाखदार 'स्टॅचू ऑफ युनिटी'चे काम पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |


 


गुजरात: ५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आणि ३५०० कामगारांच्या अथक प्रयत्नानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अखेर पूर्णत्वास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उदघाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

 

पाहुयात काय आहेत या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची वैशिष्ट्ये

 

> सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची उंची १८२ मीटर आहे. हा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे.

 

 
 

> सरदार सरोवर धरणापासून खालच्या बाजूला नर्मदा नदीपासून केवळ साडेतीन किलोमीटर अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

 
 
 

> सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा भव्य पुतळा उभारण्यासाठी ३५०० कामगार व २५० इंजिनिअर्सची फौज होती.

 
 
 

> स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी ३००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. २०१३ला पुतळ्याची पायाभरणी केल्यानंतर याचे काम लॉर्सन अॅन्ड टब्रो या कंपनीकडे देण्यात आले होते. लॉर्सन अॅन्ड टब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

 

> पर्यटकांना सरदार सरोवर धरण आणि आजुबाजूचा परिसर पाहण्यासाठी ५०० फूट उंचीवर गॅलरी उभारण्यात येणार आहे.

 

 

> या नेत्रदीपक पुतळ्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@