मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |



उत्तर प्रदेश : मथुरा येथील राहणाऱ्या एका तरुणीने इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. अर्शी खान असे या २४ वर्षीय तरुणीचे नाव आहे. आपण स्वतःच्या मर्जीने हिंदू धर्म स्वीकारला असून हा निर्णय घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. असे आशयाचे पत्र तिने धर्म परिवर्तनानंतर एसएसपी कार्यालयात जाऊन दिले.

 

इस्लाम धर्मामध्ये महिलांचा सन्मान होत नाही, त्यामुळे मी हिंदू धर्माचा स्वीकार केल्याचे अर्शीने सांगितले. यावेळी ती बोलताने म्हणाली की, "हिंदू धर्मात दुर्गा, सीता, लक्ष्मी सारख्या अनेक देवींची पूजा केली जाते मात्र इस्लाम धर्मात एकाही देवीची पूजा केली जात नाही". याविषयी अधिक बोलताना अर्शी म्हणाली माझं भगवान श्रीकृष्णांवर प्रेम आणि विश्वास आहे. तसेच मी हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर अर्शी नाव बदलून आरुषि हे नाव ठेवले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@