स्टेट बॅंक ऑफ मॉरिशस, मुंबई शाखेच्या १४३ कोटींवर डल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : नरीमन पॉईंट येथील स्टेट बॅंक ऑफ मॉरिशसच्या शाखेतील १४३ कोटींची रक्कम सायबर हल्लेखोरांनी देशाबाहेर वळती केल्याची तक्रार बॅंकेने मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली आहे. ५ ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या या तक्रारीत सायबर हल्लेखोरांनी बॅंकेच्या सर्वर लक्ष्य करत विविध देशांमधील खात्यांमध्ये ही रक्कम वळती केल्याचे म्हटले आहे. पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी हा सायबर हल्ला आहे कि नाही याची पुष्टी केली नसून बॅंकेतील अंतर्गत तपास सुरू आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांनी या हल्ल्यासाठी मदत केली आहे का याचाही शोध सध्या सुरू आहे.


मुंबईत नरीमन पॉईंट येथील रहेजा टॉवर येथे या बॅंकेचे कार्यालय आहे. १९९४ पासून भारतात कार्यरत असणाऱ्या या बॅंकेच्या मुंबईसह चेन्नई, हैदराबाद, रामचंद्रपुरम आदी शाखा आहेत. बॅंक प्रामुख्याने एनआरआय सेवा, गुंतवणूक आणि व्यापाराशी निगडीत सेवा पुरवते. बॅंकेने याबाबत कोणतिही माहिती देण्यास नकार दिला आहे. सायबर तज्ज्ञांकडे हे प्रकरण असून बॅंकेतील सर्व्हर प्रणाली आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू आहे. हल्लेखोरांनी चोरलेली रक्कम विविध बॅंकांच्या खात्यांमध्ये वळती केली आहे. दरम्यान सायबर हल्लेखोरांद्वारे बॅंकेला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आलेली या वर्षातील ही तिसरी घटना आहे. ऑगस्टमध्ये कॉसमॉस बॅंकेच्या पुणे शाखेतून सुमारे ९४ कोटी लुटण्यात आले होते. त्यातील ७८ कोटी परदेशातील २८ खात्यांतर्गत वळते केले होते. या प्रकरणी सात जण अटकेत आहेत. त्यांचा चेन्नईत झालेल्या दरोड्यातही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. चेन्नईत युनियन बॅंकेच्या शाखेवर हल्ला करून २०१७मध्ये चोरट्यांनी ३३ कोटींचा गंडा घातला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@