#METOO साठी कायदेतज्ञांची समिती स्थापन करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |



नवी दिल्ली: हॅशटॅग मी टू या चळवळीतून समोर आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये कायदेतज्ञांचा समावेश असेल. या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मीटूच्या चळवळीने थैमान घातले आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री तसेच पत्रकारांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मीटू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.

 

मी टूच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रत्येक महिलेचं दु:ख आणि त्यांची व्यथा मी समजू शकते, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. 'या तक्रारींच्या चौकशीसाठी चार निवृत्त न्यायाधीशांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही समिती स्थापन होईल आणि या सर्व तक्रारींवर सुनावणी होईल', अशी माहिती त्यांनी दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@