कुष्माण्डा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2018
Total Views |



सुरासम्पूर्ण कलशं रुधिरा प्लुतमेव च।

दधाना हस्तपदमाभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥

 

आई दुर्गाजीचे चतुर्थ स्वरुपाचे नावकुष्माण्डाहोय. आपल्या मंद, हलक्या हसण्याद्वारेअंडअर्थात ब्रह्मांडाला निर्माण केल्यामुळे त्यांनीकुष्माण्ड देवी भगवतीनाव प्रचलित झाले. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चहुकडे अंध:कारच अंध:कार भरलेला होता, त्यावेळी याच माता भगवतीने आपल्या ईषत हसण्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. त्यामुळेच या माता सृष्टीच्याआदिस्वरुपा’ ‘आदिशक्तीहोय. यांच्या पूर्व ब्रह्मांड नव्हते.

 

यांचे निवास सुर्यमंडळाच्या आतील लाकेमध्ये आहे. सुर्यलोकात निवास करण्याची क्षमता आणि शक्ती केवळ यांच्यात आहे. त्याच्या शरीराची अंगकांती आणि प्रभा सूर्याच्या समान दैदिभान होय आणि भास्वर आहे. यांची तुलना इतरांशी हेऊ शकत नाही. यांचे तेज आणि प्रभावाची तुलना करु शकत नाही. यांच्या तेजाने दाही दिशा प्रकाशाने तेजोमय होत असतात. ब्रह्मांडातील सर्व वस्तू आणि प्राणिमात्र यांच्या तेजामुळे छायांकित आहेत. अष्टभूजा (आठ) हाताच्या असून त्यामुळे माताअष्टभूजानावाने संबोधिल्या जातात. सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र, गदा आठव्या हातात सर्व प्रकारच्या सिद्धी धन देणारी जपमाळा आहे. यांचे वाहन सिंह आहे. संस्कृत भाषेत कुष्माण्डकोहळ्याला म्हणतात. बळी देण्याकरिता कोहळ्यांचा बळी देण्याची सर्वाधिक प्रथा आहे. त्यामुळेच आई दुर्गाजीलाकुष्माण्डाम्हणतात.

 

नवरात्री पूजेच्या चौथ्या दिवशी कुष्माण्डा देवीच्या स्वरुपाची पूजा करतात. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर राहते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि निश्चित मनाने कुष्माण्डा देवीच्या रुपास लक्षात ठेऊन पूजा-उपसना कार्यात मग्न झाले पाहिजे. यांची पूजाअर्चा केल्याने आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्याची वृद्धी होते. कुष्माण्डाची थोडी सेवा आणि भक्ती प्रसन्नता देणारी होय. साधकाने उद्यापासून शरणागत झाले तर अत्यंत उच्च पदापर्यंत साधक पोहोचतो. ते प्राप्त होते. शास्त्रात-पुराणात सांगितल्याप्रमाणे, जर आचारविचार ठेऊन साधना, आराधना केली तर नक्कीच सर्वांपेक्षा अग्रेसर साधक राहील. आई दुर्गाजीच्या भक्तीमार्गावर थोडे पाऊल पुढे चालल्यावर भक्त साधकाला त्यांच्या कृपेचा सूक्ष्म अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आईची उपासना मनुष्याला सहज भावाने भवसागरातून पार करण्यास सहज सुलभ मार्ग होय. आई कुष्माण्डू देवीच्या उपासनेने व्याधी, आजार सर्वांतून मुक्त करुन सुखसमृद्धी आणि उन्नतीच्या मार्गावर जाण्यास सुलभ होईल. ज्यांना आपली उन्नती, समृद्धी, भरभराट पाहिजे असेल तर त्यांनी सदैव देवीच्या उपासनेत मग्न राहिले पाहिजे.

 

 
- पुरुषोत्तम काळे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@