युथ ऑलिम्पिक २०१८: भारताच्या शिरपेचात आणखीन एक 'सुवर्ण'तुरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2018
Total Views |


 

 

अर्जेटिना: भारताच्या १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने भारतासाठी युवा ऑलिम्पिकमध्ये १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे. भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिनुंगा आणि नेमबाजीमध्ये मनू भाकेर यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. आत्तापर्यंत भारताच्या नावावर ३ सुवर्ण व ३ रौप्य पदके आहेत.
 

सौरभने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये अंतिम फेरीत २४४.२ गुणांची कामे केली. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या सुंग युन्हो याने २३६.७ गुण मिळवले. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्वित्झर्लंडच्या सोलारी जेसनला याने २१५.६ गुण मिळवले. आठ जणांच्या अंतिम फेरीत मेरठच्या सौरभने १८ वेळा दहा गुणांची कमाई केली.

 

याआधी ९ तारखेला मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तिने २३६.५ कमाई करत सुवर्ण पदक साधले होते. मनू भाकेरने याआधी वर्ल्डकप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकवले होते. मनू भाकरीच्या नावावर विविध स्पर्धांमध्ये ४ सुवर्ण पदके नावावर जमा झाली आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@