नागराज मंजुळे निर्मित पहिला मराठी सिनेमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : 'फँड्री' आणि 'सैराट' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमे देणारे नागराज मंजुळे यांचा निर्माता म्हणून पहिला सिनेमा येत आहे. 'नाळ' असे या सिनेमाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन 'सैराट' सिनेमाचे कॅमेरामन सुधाकरन रेड्डी यांनी केले आहे. माझ्याच मनातील गोष्ट सुधाकरन सांगतोय असे म्हणत नागराज मंजुळे यांनी फेसबुकवर 'नाळ' या सिनेमाचा टीझर पोस्ट केला.
 
 
 
 
 
 

नितीन वैद्य, विराज लोंढे, निखिल वराडकर, प्रशांत पेठे हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. नाळ या सिनेमात नदीच्या पाण्यात पोहणारा एक लहानगा दिसतो. हा टीझर अवघा दीड मिनिटाचा असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. फँड्री आणि सैराटच्या यशामुळे नागराज मंजुळे यांच्याकडून मराठी सिनेसृष्टीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठी सिनेरसिकांशी नागराज यांची 'नाळ' चांगलीच जोडली गेली आहे. त्यामुळे ते आता यावेळी आपल्या सिनेमातून काय नवीन घेऊन येणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर सापडायला प्रेक्षकांना १६ नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी हा प्रदर्शित होत असून त्यातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@