ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांना शासनाचा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |


 

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर 

 

मुंबई : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या २०१६ व २०१७ चे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाले आहेत. २०१६ साठी दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर तर २०१७ साठी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, साप्ताहिक विवेकचे माजी संपादक व ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

याचबरोबर पत्रकारितेतील इतर पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले आहेत. महासंचालनालयामार्फत पुरस्कारांसाठी राज्यभरातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत या प्रवेशिकांची तपासणी करण्यात आली. या समितीने निवड केलेल्या पत्रकारांची नावेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केली. लवकरच हे पुरस्कार मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@