आपचे मंत्री कैलाश गहतोल यांच्या घरावर छापे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |

करचोरी प्रकरणी आयकर विभागाचे १६ ठिकाणी छापे


 

 

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे वाहतूक मंत्री व आम आदमी पक्षाचे नेते कैलाश गहतोल यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. गुरुग्राम पासून ते दिल्ली पर्यंत गहतोल यांच्याशी संबंधित सोळा ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला. करचोरी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. राजधानी दिल्लीच्या परिसरातील एकूण १६ ठिकाणी ३० पेक्षा जास्त अधिकारी या कारवाईमध्ये सामील आहेत.
 

आयकर विभागाने कैलास गहलोत, हरीश गहलोत, विरेश गहलोत, हितेश गहलोत यांच्या घरावर तर ब्रिस्क इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड डेव्हलपर्स आणि कॉर्पोरेट इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये धाड टाकली. यामध्ये वसंत कुंज येथील घर तसेच नजफगढ, डिफेन्स कॉलनी, दर्यागंज, लक्ष्मी नगर आणि गुरुग्राम या ठिकाणांचा समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@