पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |


नवी दिल्ली : भाजपने आजवर केवळ समाजसेवाच केली आहे, दुसरे काही नाही. भाजपने सत्तेचा वापर लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठीच केला, तिथेच काँग्रेस ने राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन केले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हल्ला चढविला. मोदी अॅपवरून भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, फक्त एका घराण्याचा फायदा करून देण्यासाठी काँग्रेस ने गेल्या ६० वर्षांपासून समाज वाटण्याचे काम केले आहे. भाजपने समाजाला एकत्र करण्याचा आणि आनंद देण्यावरच भर दिला आहे. निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांना हरविणे ही बाब आमच्यासाठी अहंकाराची नाही, तर निवडणुकीत मिळालेला विजय हा आमच्यासाठी लोकसेवा करण्याची संधी उपलब्ध करीत असतो, असे त्यांनी सांगितले.

 

विरोधकांची आघाडी उभी करण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत आहे, पण ही एक अपयशी कल्पना आहे. कारण राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास कोणताही राजकीय पक्ष तयार नाही. अलीकडील काही उदाहरणांवरून हे स्पष्ट झाले आहे. इतर सर्व पक्षांना आपल्या नियंत्रणात ठेवून सत्ता बळकवण्याची काँग्रेस ची योजना आहे. अन्य पक्षही सत्तेचे सुख दिसू लागताच एकत्र येण्याची कसरत करीत असतात. कर्नाटकात आपण याचा अनुभव घेतला आहे, असे मोदी म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वांना विश्वासात घेऊन छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे विभाजन केले आणि एकच भाषा बोलणार्या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवले, असा आरोपही मोदी यांनी केला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@