न्यू फरक्का एक्सप्रेस घसरली; ७ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |



उत्तर प्रदेश : रायबरेलीवरून दिल्लीला जाणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसचे आठ डबे घसरून सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये जवळपास २७ जण गंभीर जखमी झाले आहेत. न्यू फरक्का एक्स्प्रेस रायबरेलीहून दिल्लीच्या दिशेने जात असताना हरचंदपूर रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला. रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  

दुर्घटनास्थळी एनडीआरएफ व स्थानिक पोलिस बचावकार्य करत असून अडकलेल्या प्रवाशांना घसरलेल्या डब्यातून बाहेर काढण्यात येत आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले असून प्रवाशांच्या मदतीसाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या अपघातात आपला जीव गमावणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबियांना ५ लाख तर जखमींना १ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

 

हेल्पलाईन नंबर : ०६१२-२२०२२९०, २२०२२९१, २२०२२९२ 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@