ब्रह्मचारिणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
दधाना करमद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।

देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुतर्मा॥

 

माता दुर्गाजीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणिका होय. या ठिकाणी ‘ब्रह्म’ शब्दाचा अर्थ ‘तपस्या’ होय. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चारिणी, म्हणजे तपाचे आचरण करणारी. म्हटले आहे की, “वेदस्तत्वं तमो ब्रह्म”- वेद, तत्त्व आणि तप ब्रह्म शब्दाचे हे अर्थ होय. ब्रह्मचारिणी देवीचे रूप पूर्ण ज्योतिर्मय व भव्य स्वरूपाचे आहे. या देवीच्या उजव्या हातात जप करण्याची माला व डाव्या हातात कमण्डलू असतो.

 

माता पूर्वजन्मात ज्या वेळी हिमालयाच्या घरी कन्यारूपात जन्म घेतला, त्यावेळी नारदमुनींच्या उपदेशाने या माताजीने भगवान श्रीशंकर पती मिळावे म्हणून अतिशय कठीण तपस्या केली. ही कठीण अशी तपस्या केल्यामुळे या मातेस तपश्चारिणी, म्हणजेच ब्रह्मचारिणी या नावाने संबोधित करतात. सुमारे एक हजार वर्षे माताजींनी फक्त फल-कंदमुळे खाऊन आपली क्षुधा भागविली. १०० वर्षांपर्यंत फक्त शाकवर उदरनिर्वाह केला. अतिशय भयानक कष्ट घेतले, काही दिवस कठीण उपवास केले. उघड्या आभाळाच्या खाली पाऊस आणि ऊन यांचा अतिशय ताप व त्रास सहन केला. एवढ्या कठीण तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षे फक्त जमिनीवर खाली पडलेली बेलाची पाने खाऊन आपला उदरनिर्वाह केला व भगवान शंकरांची आराधना केली. यानंतर सुकलेली बेलाची पाने खाण्याचे सोडले. कित्येक हजारो वर्षे पाणी व निराहार तपस्या करीत असे. पाने (पर्ण) खाणे सोडून दिले, म्हणून त्यांना अपर्णा असे नाव पडले.

 

कित्येक हजार वर्षे व्रत व तपस्या केल्याने ब्रह्मचारिणी देवीचे पूर्वजन्मातील शरीर एकदम अशक्त झाले, त्या अत्यंत कृशकाय झाल्या. त्यांची शरीराची अशी दशा झाल्याने त्यांच्या मातोश्री मोना अत्यंत दु:खी झाल्या. त्यांनी या कठीण तपस्येपासून अलग करण्यासाठी आवाज दिला, ‘उमा’. अरे नाही. ओ नाही. त्यावेळेपासून त्यांना म्हणजे ब्रह्मचारिणीला पूर्वजन्माच्या उमा नावाने संबोधले गेलेत्यांच्या या तपस्येमुळे लोकांमध्ये हाहाकार झाला. देवता, ऋषी, सिद्धगण, मुनी या समस्त मंडळींनी ब्रह्मचारिणी देवीचा हे अद्भुत पुण्यकृत्य केल्याने जयजयकार केला. शेवटी वडील पितामह ब्रह्माजी यांच्याद्वारा त्यांना संबोधित करताना अत्यंत प्रसन्न स्वरात ते म्हणाले, “हे देवी! कोणीही इतकी कठीण तपस्या केली नाही. ही तपस्या तूच करू शकतेस. तुझ्या या अलौकिक कृतीमुळे तुझा चारही बाजूस जयजयकार होत आहे. तुझी मनोकामना सर्वतोपरी परिपूर्ण होईल. भगवान चन्द्रमौळभ शंकरजी पती म्हणून तुला मिळतील. आता तपस्या समाप्त करून घरी परत ये! लवकरच तुझे पिताश्री तुला बोलावण्यास येत आहेत.”

 

आई दुर्गेचे दुसरे रूप भक्तांना, साधना करणारे सिद्ध यांना अनंत फळ देणारे होय. याची उपासना केल्याने मनुष्यात तप, त्याग, वैराग्य, संयम यांची वृद्धी होते. जीवनातील कठीण संघर्षामध्ये मन कर्तव्यापासून तसुभरही विचलित होत नाही. आई ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सगळीकडे सिद्धी व विजयाची प्राप्ती होते. दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी याची पूजाअर्चा करतात. या दिवशी भक्ताचे, साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर असते. या अवस्थेत मानव योगी आईची कृपा आणि भक्ती मिळवतो.

 
 - पुरुषोत्तम काळे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@