रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |



७८ दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार


नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करून गुड न्यूज दिली. यावर्षीच्या दिवाळीत रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगार हा बोनस म्हणून मिळणार आहे. या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून लवकरच याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने रेल्वेच्या १२ लाख कर्मचाऱ्यांच्या घरी यावर्षी धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाणार आहे. याबाबतची माहिती

 

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्ली येथील कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पावर २ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर दुर्गापूजेच्या आधी हा बोनस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. यातील काही रक्कम दसऱ्याच्या अगोदर जमा होणार आहे. दरम्यान, वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@