मेवानीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

'मेवानीने मोर्चा सोडून चर्चा करावी'

दिल्लीकरांची जिग्नेश मेवानीवर टीका





दिल्ली :
पोलिसांनी परवानगी नाकारलेली असताना देखील गुजरातचा आमदार जिग्नेश मेवानी याने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'युवा हुंकार' मोर्चाच्या बंदोबस्तासाठी नवी दिल्लीमध्ये पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे  मोर्चाचे आयोजन केल्यामुळे मोर्चेकरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्ली दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.
 


पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील मेवानी आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील संसद मार्गावर आज मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे संसद मार्गावर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मेवानीच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे मोर्चादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दंगल विरोधी पथकांना देखील पाचारण करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे, यामुळे संसद मार्ग परिसरामध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
मेवानी याच्या 'युवा हुंकार' या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेवानीवर टीका करणारे पोस्टर्स दिल्लीतील काही नागरिकांकडून रस्त्यावर लावण्यात आले आहेत. मेवानी हा फक्त चिथावणीखोर वक्तव्य करून समाजामध्ये वाद लावण्याचे काम करत आहे. मोर्चा काढून चिथावणीखोर वक्तव्य करण्याऐवजी त्या लोकांपासून अडचण आहे, त्यांच्याशी सामोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान त्याला पोस्टर्समधून करण्यात आले आहे.



सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी मेवानी, जेएनयूमधील विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी नेत्यांनी आज दिल्लीत 'युवा हुंकार मोर्चा' पुकारला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर याच्या सुटकेची मागणी मेवानी आणि त्याच्या साथीदारांकडून केली जात आहे. मेवानी याने पुण्यामध्ये केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु तरी देखील मेवानी आणि त्याच्या साथीदारांकडून हा मोर्चा काढला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@