डोपिंग चाचणीत युसुफ पठाण दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

 
मुंबई :  प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि इरफान पठाण याचा भाऊ युसुफ पठाण डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्याची बातमी समोर आली आहे. डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयने युसुफ पठाणला ५ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
 
१६ मार्च २०१७ रोजी नवी दिल्ली येथे टी-२० सामन्याजरम्यान ही चाचणी करण्यात आली होती, यामध्ये 'टब्र्यूटेलिन'चे प्रमाण आढळून आले होते, ज्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. 'टब्र्यूटेलिन' या पदार्थाला जागितक डोपिंग विरोधी संस्थेच्या (वाडा) प्रतिबंधित औषधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
 
या प्रकरणात आपली बाजू मांडत युसुफ पठाण यांने "मी खोकला असल्या कारणाने कफ सिरप घेतले होते ज्यामुळे असे घडले." असे म्हटले आहे. खोकल्याच्या औषधातून निशीद्ध पदार्थांचे सेवन केल्यामुळे असे घडत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
 
पठाण याच्यावर २७ ऑक्टोबर २०१७ रोजी बीसीसीआयतर्फे डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आता अखेर त्याला निलंबित करण्यात आले आहे. जाणूनबुझून आपण हे केले नाही, केवळ खोकल्यासाठी म्हणून औषध घेतले होते, असे स्पष्टीकरण पठाणने दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@