तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे - सुरेश हावरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
ठाणे : तरुणांनी उद्योगाकडे लक्ष केंद्रित करायला हवे, उद्योग करायला पैसा लागत नाही, तो पैसा आपल्याकडे कसा आणायचा हे कौशल्य आपल्याकडे हवे, प्रत्येक तरुणाने यशस्वी उद्योजक बनले पाहिजे, कुणबी समाजाचे तरुण उच्च शिक्षण घेत आहेत. परदेशात शिक्षण आणि नोकरी करत आहेत. या तरुणांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा उपदेशपर सल्ला श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष तथा बी टेक, अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे यांनी कुणबी समाजाच्या तरुणांना दिला आहे.
 
ठाणे शहर कुणबी सेवासंघाच्या ११ व्या वार्षिक स्नेह महासंमेलनाच्या कार्यक्रमात येऊर येथील कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योजक सुरेश हावरे यांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कुणबी समाजाच्या मतांचा फायदा मला निवडणुकीत नेहमी होतो, असे सांगताना कुणबी समाजाचे स्नेह महासंमेलन हा समाजाच्या एकोप्याचे चांगले उदाहरण आहे, असेही सांगितले.
 
 
लेझीम, सुरेल वाद्यवृंद व कुणबी पारंपरिक गाण्यांच्या भोंडला गीतांसह नृत्य, एकपात्री नाट्य, मालिका कलाकार आणि समाजबांधवांची दोन हजारांच्या आसपास सहकुटुंब उपस्थिती अशा मोठ्या जल्लोशात ठाण्यातील कुणबी सेवासंघाचे ११ वे वार्षिक स्नेह महासंमेलन रविवारी येऊर येथील शर्मा फार्म हाऊसवर रंगले.
 
@@AUTHORINFO_V1@@