ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
ठाणे : स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महापालिकेला होणारा  बुधवार दि. १० जानेवारी रोजी सकाळी ९ ते गुरुवार दि.११ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
 
त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा बुधवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ९ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा - कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग बुधवार दि.१० जानेवारी रोजी रात्रौ ९ ते गुरुवार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
 
या शटडाऊन पाणीपुरवठ्यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@