Vodka Diaries Trailer : ''मी तुला पकडलं''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |


 
हिंदी मध्ये बऱ्याच कालावधीनंतर एक आश्वासक 'थ्रिलर' चित्रपट येत आहे. 'वोडका डायरीज' असं या चित्रपटाचं नाव आहे. यात 'स्टारडम' असणारे कलाकार नसले तरी कलेची अचूक जण असणाऱ्या अभिनेत्यांनी या चित्रपटात नक्कीच रंगत आणली असणार याची चुणूक लागते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल असं आत्तातरी वाटत आहे. चार खून करणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करता करता अखेर एसीपी अश्विनी दीक्षित 'मी तुला पकडलं' या आशयाचा संवाद म्हणतो आणि ट्रेलर संपतो...
 
 
के. के. मेनन, मंदिरा बेदी व रायमा सेन या तीन कलाकारांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. यातील एसीपी अश्विनी दीक्षितची व्यक्तिरेखा मेनन याने साकारली आहे. अशा प्रकारच्या अनेक भूमिका त्याने या अगोदर केल्या असल्याने तो यातही अगदी चपखल बसला आहे. मंदिरा बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसत आहे.
 
 
कुशाल श्रीवास्तवा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून तो १९ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी 'थ्रिलर' स्वरूपात मोडणारे काही चित्रपट प्रदर्शित झाले खरे पण त्यातही केवळ सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिंन्हा यांचा 'इत्तेफाक' सोडला तर कोणताही चित्रपट फार प्रभाव पडू शकला नाही. त्यामुळेच असे चित्रपट बघण्याची आवड असणाऱ्या रसिकांसाठी 'वोडका डायरीज' हा चित्रपट मनोरंजन करू शकेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@