जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. अनंतनाग येथे आज सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. मात्र या चकमकीत एकही दहशतवादी ठार झाला नव्हता मात्र आता दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश मिळाले आहे. 
 
 
 
जम्मू-काश्मीरमधील कोकेरनाग येथे देखील आज सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. आज सकाळी अनंतनाग, लारनू आणि कोकेरनाग या भागात अचानक गोळीबार सुरु झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षक सावधान होत या गोळीबाराला प्रतिउत्तर देवू लागले. 
 
 
 
जेथे आज गोळीबार झाला ते ठिकाण पूर्णपणे जंगल स्वरुपात आहे. त्यामुळे या सगळ्या जागेला सुरक्षा रक्षकांकडून पूर्णपणे घेरण्यात आले आहे. या जंगलात अजून तीन ते चार दहशतवादी लपले असल्याची शंका सुरक्षा रक्षकांना असल्याने या भागात घेराव घातला आहे. अजून देखील काही ठिकाणी चकमक सुरु आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@