स्पेअर पार्ट्सची चोरी करणार्‍या दोघांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

साडेदहा कोटी रुपयांची फसवणूक

 

 
 
 
नाशिक : भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीची तब्बल साडेदहा कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. स्पेअर पार्टस्‌ची चोरी करत, तसेच कंपनीच्या नावे बनावट स्पेअर स्पार्ट्स तयार करून त्याची विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उघड केले.
 
वाहनांचे स्पेअर स्पार्ट्स बनविण्यात अग्रेसर असलेल्या नाशिकच्या बॉश कंपनीतून कच्चा माल परस्पर बाहेर नेऊन या मालापासून बनावट स्पेअर पार्ट तयार केले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी शिश अहमद हुसैन खान आणि अहमद रजा शुभराजी खान यांना अटक केली आहे.
 
बॉश कंपनीच्या जवळच असलेल्या पंडित कॉलनी परिसरात एका तीन मजली इमारतीमध्ये हे बनावट स्पेअर स्पार्ट्स तयार केले जात होते. ट्रकमधून हा माल बाजारात जात असताना पोलिसांनी छापा मारून डिझेलच्या गाड्यांसाठी लागणारे नोझल, नीडल्स, व्हॉल्व सेट, पिस्टन असा एकूण २३ टन माल आणि २ वाहने जप्त केली. कंपनीतीलच एक कॉन्ट्रक्टर यातील सूत्रधार असल्याचा संशय आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून अशाप्रकारे काम करणारे एक मोठे रॅकेटच शहरात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
@@AUTHORINFO_V1@@