एल साल्व्हाडोरच्या नागरिकांची अमेरिकेतून हकालपट्टी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |



वॉशिंग्टन : अमेरिका खंडातील छोटासा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एल साल्व्हाडोर या देशाच्या नागरिकांची लवकरच अमेरिकेमधून (यूएसए) लवकरच हकालपट्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेमध्ये काम करत असलेल्या जवळपास २ लाख एल साल्व्हाडोरच्या नागरिकांना लवकरच कामावरून आणि देशातून बाहेर काढण्याचे आदेश देणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे एल साल्व्हाडोरच्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या १७ वर्षांपूर्वी एल साल्व्हाडोरच्या नागरिकांना अमेरिकेत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी देण्यात आलेली परवानगी लवकरच रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा ट्रम्प प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द झाल्यानंतर अमेरिकेतील एल साल्व्हाडोरच्या सर्व नागरिकांना अमेरिका सोडून आपल्या मायदेशी परतण्याची वेळ येऊ शकते.

२००१ मध्ये एल साल्व्हाडोरमध्ये सातत्याने झालेल्या भूकंपानंतर एल साल्व्हाडोरमधील नागरिकांना एका प्रकल्पाअंतर्गत अमेरिकेमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर एल साल्व्हाडोरमधील अनेक नागरिक अमेरिकेमध्ये नोकरीसाठी स्थायिक झाले होते. तसेच गेल्या १७ वर्षांपासून एल साल्व्हाडोरचे अनेक नागरिक हे अमेरिकेतील अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@