रा. स्व. संघाची शाखा हा प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचा विषय : उदय शेवडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
खोपोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गेली ९२ वर्षे दैनंदिन शाखांच्या माध्यमातून संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करीत आहे, तसेच आपल्या दीड लाख सेवा कार्यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीकरीता झटत आहे. अनेकजण संघाच्या बाहेर राहून संघाविषयी चांगले-वाईट मत बनवत असतात. या सर्वांनी संघाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, कारण संघ हा अनुभूती घेण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे बौद्धिक प्रमुख उदय शेवडे यांनी खोपोली येथे बोलताना केले.
 
संघाच्या खालापूर तालुक्याच्या वतीने खोपोलीतील जनता विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू चेतना संगम' कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे आदिवासी श्रीराम सेवा संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष काशिनाथ महाराज वाघुले, तालुका संघचालक राकेश पाठक, कार्यवाह दिपक कुवळेकर इ. मान्यवर उपस्थित होते.
 
सुरूवातीला दिपक कुवळेकर यांनी तालुक्यातील संघकामाचा आढावा घेतला. त्यानंतर शेवडे यांनी १९८९ साली डॉ. हेडगेवारांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य सुरू झाली, तर २००६ साली गोळवलकर गुरूजींच्या जन्मशताब्दी वर्षानंतर संघाने धर्मजागरण, कुटंब प्रबोधन, गोसेवा हे आयाम सुरू केल्याचे सांगितले. काशिनाथ महाराज वाघुले यांनी संघामध्ये असलेल्या शिस्तीचे कौतुक केले. अजित शिंदे व ओंकार भट यांनी गीते सादर केली. दिपक हातनोलकर यांनी अमृतवचन सादर केले. कार्यक्रमाला ४७५ स्वयंसेवक व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@