दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात चकमक सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील कोकेरनाग येथे आज सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु झाली आहे. या चकमकीत अजून एकही दहशतवादी ठार न झाल्याची बातमी मिळत आहे. मात्र सुरक्षा रक्षक या गोळीबाराला चोख प्रतिउत्तर देत आहेत. जम्मू-काश्मीरमधील अजून काही महत्वाच्या भागांमध्ये चकमक सुरु आहे. 
 
 
काल जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदुरा क्षेत्रात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले होते. काल सुरक्षा रक्षक, सीमा सुरक्षा दल अर्थात सीआरपीएफ आणि विशेष मोहीम गट अर्थात ओएसजी या दहशतवाद्यांवर नजर ठेवून होते. 
 
 
२६ जानेवारीला या दिवशी राजधानी दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याने सध्या संपूर्ण सीमेवरील सुरक्षा व्यवस्था तसेच राजधानीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@