कर्मचारी एस. टी. महामंडळावर नाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

९० ऐवजी फक्त १८ कर्मचार्‍यांना गणवेशाचे वाटप

 

 
 
नाशिक : एसटी महामंडळाकडून सिटी बस बंद करण्याचा घाट घातला जात असल्याने प्रवासी नाराज असतानाच गणवेश वाटपामुळे कर्मचारी देखील संतप्त झाले आहेत. कर्मचार्‍यांना नव्या गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात हे एक नाटकच ठरले.
 
शनिवारी विभागीय कार्यालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९० ऐवजी फक्त १८ कर्मचार्‍यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. राहिलेल्या कर्मचार्‍यांना तीन ते चार महिन्यांनी गणवेश मिळणार आहे असे समजते. वाटप केलेल्या गणवेषाबाबत देखील अनेक तक्रारी आहेत. शर्ट प्रत्यक्षात मापापेक्षा मोठा तर पॅन्ट छोटी, बूट देखील मापाचे नाहीत यामुळे पोरखेळ आरंभल्याची चर्चा होती. खास फोटोसेशनसाठी त्या कर्मचार्‍यांनी नवीन गणवेश घालून येण्याचेही फर्मान सोडण्यात आले. त्यामुळे या सर्व बाबी उघड झाल्या.
 
कर्मचार्‍यांच्या वेतनकराराबाबत निर्णय नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये आनंदी वातावरण नाही. त्यामुळे या कार्यक्रमावर कर्मचारी संघटनेने बहिष्कार घातला होता. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान एसटीला तब्बल २० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र गणवेश वाटप कार्यक्रमविभागीय कार्यालयात घेण्यासाठी १० हजार रुपये खर्च करण्यासाठी मान्यता देण्यात आल्याबद्दल नाराजीची भावना आहे. सिटी बस देखील बंद करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि रोज प्रवास करणारा प्रवासी वर्ग नाराज आहे. या प्रकाराने लोकांच्या नाराजीत भर पडली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@