समाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन देणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

माजी कुलगुरू म्हैसेकर यांचे प्रतिपादन

 

 
 
नाशिक : “समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. अशा प्रकारच्या उत्तम शोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉ. संदीप गुंडरे, वैद्य श्रीराम सावरीकर, डॉ. तापस कुंडू, डॉ. प्रिती बजाज, डॉ. व्ही. आर. सोनांबेकर, डॉ. राहूल पाटील, डॉ. ज्योती दुबे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. जया कुरुविल्ला, डॉ. मित्रा, डॉ. देवकर, डॉ. स्वप्नील शिवगुंडे, विद्या ठाकरे, डॉ. स्वप्नील तोरणे आदी उपस्थित होते.
 
यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, समाजात असणार्‍या समस्यांचा विचार करून त्याला उपयुक्त ठरणार्‍या संशोधनाची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी, त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनाला लोकमान्यता मिळावी असे विविध हेतू साध्य व्हावे, यासाठी विद्यापीठांचे कुलपती यांच्या प्रेरणेने ’आविष्कार’ संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर यांनी आविष्कारसारख्या स्पर्धा संशोधकास प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@