औरतों को पसंद आया मर्दोंको समझ आया 'पॅडमॅन'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
चला बघूयात कसा तयार झाला 'पॅडमॅन'
 
 
 
मुंबई : पॅडमॅनचा ट्रेलर आला, पॅडमॅनची गाणी आलीत सगळ्यांना ती आवडलीत, चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद देखील दिला. मात्र आता आला आहे "मेकिंग ऑफ पॅडमॅन"चा एक छोटासा व्हिडियो. "औरतो को पसंद आया मर्दों को समझ आया." असे म्हणत आर. बाल्की यांनी या पॅडमॅन चित्रपटात काय आहे हे एका ओळीत सांगितले आहे.
 
 
 
 
स्वत: अक्षय कुमार याने आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "जी वेडी लोक असे म्हणतात की मी जगात बदल घडवीन तीच खरोखरीच बदल घडवतात." पॅडमॅन हा चित्रपट कसा निर्माण झाला, या मागची कहाणी काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो बघा..
 
या चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्ना सांगते, "जेव्हा या चित्रपटाची संकल्पना समोर आली, त्याक्षणीच ती मला भावली कारण यामध्ये एका अशा गोष्टीवर एका पुरुषाने भाष्य केले आहे, ज्याबद्दल बोलण्यास महिलांना देखील लाज वाटते." चित्रपटाचे चित्रीकरण कसे करण्यात आले, यामध्ये कॅमेरे कसे वापरण्यात आले हे सगळं या व्हिडियो मधून दाखवण्यात आले आहे. वेडी माणसंच काही तरी वेगळं करुन दाखवतात, असे अक्षय कुमारने या व्हिडियोमध्ये म्हटले आहे.
 
" नागरिकांशी संवाद साधणं ते पण त्यांना आपण काहीतरी शिकवतोयं असं न वाटता, प्रेक्षकांसाठी ही एक अमू्ल्य भेटवस्तू आहे. आणि ही भेटवस्तु प्रेक्षकांना देण्याची क्षमता केवळ आर. बाल्की यांच्यात आहे." असे या व्हिडियोमध्ये म्हणत अक्षय कुमार याने दिग्दर्शक आर.बाल्की यांची प्रशंसा केली आहे. "एकदा बघूचयात" असे आपल्याला जाणवून देणारा हा व्हिडियो आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@