लासलगावी कांदा प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा : खासदार हरिश्चंद्र चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : लासलगावमध्ये आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘कांदा प्रक्रिया उद्योग’ सुरू व्हावा, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.
 
’’गेल्या काही वर्षांपासून माझ्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍याला नफा तर नाहीच पण उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे,’’ असेही ते पुढे म्हणाले. ’’जगभरातील देश कांदा प्रक्रिया उद्योग योजना राबवत आहेत. मग, भारतातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आपण अशी योजना का राबवत नाही?,’’असा प्रश्नही चव्हाण यांनी अधिवेशनातील ३७७ अधिसूचनेनुसार उपस्थित केला.
 
“विशेषत: नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जागतिक दर्जाच्या कांद्याचे उत्पादन करतात, पण त्यावर प्रक्रिया न केल्यामुळे हा कांदा निर्यात करणात अडचणी येतात. दरम्यान, अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत पण छोट्या शेतकर्‍यांना याचा लाभ उठवता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच पावले उचलून दिंडोरी लोकसभा क्षेत्रात अशी योजना राबवावी,’’ असेही ते म्हणाले. आरोग्यासाठी कांदा चांगला असल्याचेही चव्हाण म्हणाले. कांद्यातून ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे मिळतात. कांद्यामुळे शरीरातील लोह आणि कॅल्शियमची मात्रा वाढते. त्यामुळे औषध उत्पादनात याचा कसा वापर करता येईल, यावर संशोधनाची गरज आहे, असे त्यांना वाटते.
 
@@AUTHORINFO_V1@@