नितीश कुमार ‘मुफ्ती’ पुरस्काराने सन्मानित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
जम्मू: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना काल जम्मूमधील जोरावर सिंग हॉलमध्ये ‘मुफ्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार राजकीय कारकीर्दीमध्ये राजकीय व्यक्तींच्या स्वच्छ प्रतिमेसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. नितीश कुमार यांच्या राजकीय कार्यकाळात त्यांच्या स्वच्छ प्रतिमेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. 
 
 
 
 
 
राजकीय क्षेत्रात जो व्यक्ती पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे आपले कार्य करतो तसेच संकटाच्या काळात देखील जो व्यक्ती जनतेचा आणि देशाचा विचार करून निर्णय घेतो त्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्कार समारंभात बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी देखील उपस्थित होते. 
 
 
 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद यांच्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा ‘मुफ्ती’ हा पुरस्कार आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@