श्रॉफ हायस्कुलमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
नंदुरबार : नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये दि. ९ जानेवारी २०१८ रोजी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
 
 
 
इयत्ता नववीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाला अनुसरुन पुस्तकातील विज्ञानाच्या घटकांचे संबोध स्पष्ट होण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ४५ उपकरणे ठेवण्यात आली आहे. मेळाव्यास शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी व डॉ.कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्रॉफ हायस्कुलच्या प्राचार्या सौ.सुषमा शाह यांच्या मार्गदर्शनखाली उपप्राचार्य नानाभाऊ माळी, श्रीमती सिसोदिया, राजेंद्र कोळी, विज्ञान शिक्षक मुकेश शाह व राजेंद्र मराठे यांचे विद्यार्थ्यांना अनमोल सहकार्य लाभले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@